Satish Wagh Kidnapped and Murdered 
ताज्या बातम्या

पुण्यात आमदार टिळेकर यांच्या मामांचे अपहरणकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात खुनाचं सत्र सुरूच आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण आणि हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Published by : Team Lokshahi

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करण्यात आलं आहे. रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. सत्ताधारी पक्षातील आमदाराच्याच नातेवाईकांसोबत असं होत असेल तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न विरोधक आणि नागरिकच विचारत आहेत.

थोडक्यात

  • भाजप आमदार टिळेकर यांच्या मामांचे अपहरणकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  • सतीश वाघ प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई

  • हत्या करणाऱ्या संशयित पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

पहाटे अपहरण आणि रात्री त्याच परिसरात मृतदेह आढळल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचं राहत्या घराजवळून सोमवारी सकाळच्या सुमारास अपहरण करण्यात आलं. आणि रात्री त्याच परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. सत्ताधारी आमदारांच्या मामाचं अपहरण होतं. तिथे सामान्य जनतेचं काय? असा प्रश्न शरद पवार गटाचे नेते शरद गो-हे यांनी विचारला आहे. घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायी असून, त्याबाबत राजकारण करू नये असं आवाहन योगेश टिळेकरांनी केलं आहे.

पुण्यात खुनाचं सत्र

पुण्यातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात खुनाचं सत्र सुरूच असून गेल्या 8 दिवसांत पाच खून झाले आहेत. तर सोमवारी भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण खुनाची घटना समोर आल्यानं शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुण्यात प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांची कारवाई

पुण्यामध्ये कायदा भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाघ यांची हत्या करणाऱ्या शर्माला वाघोलीतील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमवारी सकाळी पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे यांनी अपहरण करून शिंदवणे घाटात हत्या केली होती.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा