ताज्या बातम्या

'इंदिरा गांधींची सत्ता गेली, एक दिवस पीएम मोदीही जातील' - सत्यपाल मलिक

मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे समजून घेतले पाहिजे की सत्ता कायमस्वरूपी नसते आणि ती येत-जात असते.

Published by : Siddhi Naringrekar

मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे समजून घेतले पाहिजे की सत्ता कायमस्वरूपी नसते आणि ती येत-जात असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले, "मोदीजींनी हे समजून घेतले पाहिजे की सत्तेची ताकद येते आणि जाते. इंदिरा गांधींची सत्ताही गेली, तर लोक म्हणायचे की त्यांना कोणी हटवू शकत नाही. एक दिवस तुम्हीही निघून जाल, त्यामुळे परिस्थिती इतकी खराब करू नका की ती सुधारता येणार नाही.

मलिक रविवारी जयपूरमध्ये राजस्थान युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या (RUSU) कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "देशात अनेक प्रकारच्या लढाया सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यास केंद्र सरकारच्या विरोधात युवकही आघाडी उघडतील." यासोबतच त्यांनी केंद्र सरकारवर शिपाई भरतीसाठी चालवल्या जाणाऱ्या 'अग्निपथ' योजनेवरही हल्लाबोल केला. यामुळे सैन्य कमकुवत होऊ शकते आणि केवळ तीन वर्षे सेवा बजावताना जवानांमध्ये त्यागाची भावना राहणार नाही, असे ते म्हणाले. 'अग्निपथ योजने'वर ते म्हणाले की, तीन वर्षांच्या कर्तव्यात जवानामध्ये त्यागाची भावना येणार नाही.

सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, त्यांना जेवढा माहिती मिळाली आहे, अग्निवीर सैनिकांना ब्रह्मोससह इतर क्षेपणास्त्रांना आणि शस्त्रांना हात लावू दिला जाणार नाही. म्हणूनच अग्निरथ योजनेमुळे सैन्याचाही ऱ्हास होत आहे, असे त्यांचे मत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Earthquake in Alaska : अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के; आता त्सुनामीचाही दिला इशारा

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका