Admin
Admin
ताज्या बातम्या

मोदी सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला; मोदींनी त्यावेळी गप्प राहण्यास सांगितले; सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोट

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे नेहमी काहीना काही त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही विधान केलं आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींविषयी एक गौप्यस्फोट केला आहे.

सत्यपाल मलिक म्हणाले की, पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले. गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला. अजित डोवाल यांनीही याबाबत मला गप्प राहण्यास सांगत या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल. असं त्यांनी सांगितले असल्याचे सत्यपाल मलिक म्हणाले.

पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत राग नाही. मोदी सरकारच्या चुकीमुळे हा हल्ला झाला. असे मलिक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने सध्या चांगलीच खळबळ माजली आहे.

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं