save soil sadhguru 
ताज्या बातम्या

माती वाचवा अभियानासाठी जिवाची सुद्धा परवा करणार नाही

Save Soil Mumbai Event : माती वाचवा मोहिमेसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने जमले सद्गुरू आणि आदित्य ठाकरे याच्या हस्ते वसुंधरा मोहीम 3.0 चे उदघाटन

Published by : Ashutosh Rapatwar

मुंबई : बहुप्रतिक्षित भव्य माती वाचवा सार्वजनिक कार्यक्रम काल उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे उपस्थित होते. सद्गुरूंनी 25,000 किलोमीटरहून अधिक मोटार सायकल प्रवासानंतर, काल मुंबई मध्ये भव्य सार्वजनिक कार्यक्रम घेतला. लोकांचा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. (Maharashtra Government and Sadhguru Came Together in Mumbai for Save Soil)

संपूर्ण माती वाचवा धोरण हँडबुकमधील महत्त्वाच्या गोष्टींबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना सद्गुरू म्हणाले की, शेती एक व्यावहारिक कृती असून, या कृतीला एक व्यावसायिक आधार आहे. शेती आपल्या जगण्याचा आधारही आहे. शेतीला व्यावहारिक संबोधित करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.

‘ऑरगॅनिक’ या शब्दावर भाष्य करताना, सद्गुरूंनी स्पष्टीकरण केले की, तो शब्द अन्नाची गुणवत्ता ठरवण्यासाठी पुरेसा नाही. जर आपण आज सर्व रसायने आणि खते काढून टाकली, तर अन्न उत्पादन सध्याच्या तुलनेत 25% पर्यंत खाली येतील. त्याऐवजी, त्यांनी जमिनीतील सेंद्रिय सामग्री वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. कारण त्यानंतर नैसर्गिकरित्या रसायने आणि खतांची गरज कमी होईल.

यावेळी त्यांनी त्रिसूत्री धोरणांचे वर्णन केले, ज्याद्वारे शेतकऱ्यांना शेतजमिनीतील सेंद्रिय सामग्री वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाऊ शकते.

sadhguru with aaditya thackeray

यापूर्वी सद्गुरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यामध्ये सद्गुरूंनी माती वाचवा हँडबुक मंत्र्यांना दिले. यावेळी त्यांनी माती वाचवण्याच्या कार्याला पूर्ण पाठिंबा देण्याचं वचन दिलं.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ईशा फाउंडेशनची सामाजिक शाखा, ईशा आउटरीचसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ही माती वाचवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची अभिव्यक्ती आहे आणि मातीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्व आवश्यक पावले त्वरीत उचलली जातील असे लोकांना आश्वासन आहे. माझी वसुंधरा या तिसर्‍या आवृत्तीचा शुभारंभ आज सद्गुरू करणार आहेत, जो पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हाती घेतलेला एक अभिनव उपक्रम आहे, जो पंचमहाभूते नावाच्या निसर्गाच्या सर्व पाच घटकांवर केंद्रित आहे.

भारतामध्ये, देशातील सुमारे 30% सुपीक माती आधीच नापीक बनली आहे आणि उत्पादन देण्यास असमर्थ आहे. माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेत जमिनीत किमान ३ ते ६% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय, माती शास्त्रज्ञांनी मातीच्या मृत्यूचा इशारा दिला आहे, ज्या घटनेला ‘माती नष्ट होणे’ असे संबोधले गेले आहे.

सद्गुरूंचे भारतात आगमन झाल्यापासून, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार ने या मोहिमेला आणि प्रत्यक्षात कृती करण्यासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. २१ मार्च पासून सद्गुरूंचा मोटरसायकल वर एकट्याने प्रवास सुरू झाल्यापासून, त्यांनी युरोप, मध्य आशिया आणि अरब राष्ट्रांना भेट देऊन, ते 29 मे रोजी पश्चिम बंदर शहर जामनगर, गुजरात येथे पोहोचले. या प्रवासादरम्यान त्यांनी, गुजरात, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश, अशा ९ भारतीय राज्यांमधून प्रवास केला आहे. माती वाचावा अभियानासाठी मी वेळप्रसंगी जीवाची पर्वा करणार नाही, मि देशविदेशातील अनेक नेत्यांना भेटलो सर्वांनी सांगितले ही मोहीम खूप छान आहे पण फक्त पेपर वर. मला जगभरातील नेत्याची गरज नाही तर मला जगभरातील ७ अब्ज लोकांची गरज आहे. पैसे देणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांकडे नेते न सांगता लक्ष देतात पण दिवसरात्र मेहेनत करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कोणीही लक्ष देतानाही. हा प्रवास मी माझ्या जीवाची पर्वा न करता केला आहे मला वाटले नव्हते की मी जिवंत परत येईल, या पुढे ही या साठी मी माझ्या जीवाची पर्वा न करता हे काम करत राहील. अशी भावनिक साद या वेळी त्यांनी केली.

मीत ब्रदर्स (Meet Brothers) यांच्या सोबत सदगुरूंनी (sadhguru) गाणे, राधे जग्गी (Radhe Jaggi) यांचा परफॉर्मन्स ठरला लक्षवेधी

sadhguru with meet bros

राधे जग्गी, या सदगुरु यांच्या कन्या आहेत, आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि ईशा संस्कृतीने मानव आणि माती यांच्यातील संबंध जोडण्यासाठी शास्त्रीय संगीत, नृत्य आणि कलारीपयट्टू यांचे संयोजन विणले. मुंबईमधील या कार्यक्रमात माती वाचावा अभियानासाठी लोकांनी आपले चेहरे रंगवले आणि पोस्टर घेऊन व्हेव तयार केली. जुही चावला, मोनी रॉय आणि देश विदेशातील अनेक सिने कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. सद्गुरुंचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी जातीय पोशाख धारण केलेल्या लोकांसह, मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर डब्बेवाल्यानी सदगुरूंना गांधीटोपी आणि डब्बा भेट म्हणून दिला. महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक देखावाही संपूर्ण प्रदर्शनात होता. या वेळी गाणे गाताना पहिल्यांदाच मुंबई मध्ये मीत ब्रदर्स सोबत सदगुरूंनी गाणे सुद्धा गायले. या वेळी मीत ब्रदर्स यांनी आठवणीने सांगितले की सदगुरूंनी त्यांच्या आवाजाला ऑटोटोन लावण्यास विरोध केला आणि जसा आहे तसाच राहू द्या असेही सांगितले.

radhe jaggi

सद्गुरुंचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी जातीय पोशाख धारण केलेल्या लोकांसह, मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर डब्बेवाल्यानी सदगुरूंना गांधीटोपी आणि डब्बा भेट म्हणून दिला. महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक देखावाही संपूर्ण प्रदर्शनात होता. या वेळी गाणे गाताना पहिल्यांदाच मुंबई मध्ये मीत ब्रदर्स सोबत सदगुरूंनी गाणे सुद्धा गायले. या वेळी मीत ब्रदर्स यांनी आठवणीने सांगितले कि सदगुरूंनी त्यांच्या आवाजाला ऑटोटोन लावण्यास विरोध केला आणि जसा आहे तसाच राहू द्या असेही सांगितले.

face painting for save soil

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी

पावसाळ्यात गरमागरम बाजरीची खिचडी खा, अनेक फायदे जाणून घ्या