Sawantwadi Priya Chavan Case : 'आधी गळा आवळला, नंतर फास लावल्याचा संशय'; प्रिया चव्हाणसोबत नेमकं काय घडलं?  Sawantwadi Priya Chavan Case : 'आधी गळा आवळला, नंतर फास लावल्याचा संशय'; प्रिया चव्हाणसोबत नेमकं काय घडलं?
ताज्या बातम्या

Sawantwadi Priya Chavan Case : 'आधी गळा आवळला, नंतर फास लावला?'; प्रिया चव्हाणसोबत नेमकं काय घडलं?

सावंतवाडी आत्महत्या प्रकरण: प्रिया चव्हाणच्या मृत्यूमागील संशयास्पद परिस्थितीवर सखोल तपास सुरू.

Published by : Riddhi Vanne

Sawantwadi Priya Chavan : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता सिंधुदुर्गमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली मिलिंद माने यांच्या 33 वर्षीय नवविवाहित सुनं प्रिया चव्हाणने सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे शुक्रवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिला चार वर्षांची लहान मुलगी आहे. तिला मागे ठेवत प्रियाने टोकाचं पाऊल उचललं. प्रियाच्या माहेरीच्यांनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मात्र तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी प्रणाली मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य मिलिंद माने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी प्रिया चव्हाणचे वडील, भाऊ, बहिणी आदी नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली.

त्यानंतर प्रिया यांचे वडील विलास तावडे यांनी रविवारी सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत मुलीच्या आत्महत्येला सासरच्या मंडळीचे नातेवाईक जबाबदार असल्याचं म्हटलं. त्यांनी थेट प्रणाली माने आणि अन्य एकाने आपल्या मुलीला आत्महत्येपूर्वी सतत त्रास दिल्याचं तक्रारीत नमूद केलं. अपमानित करणं आणि जीवाला लागेल असे बोलल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. वडिलांच्या या तक्रारीवरून रात्री उशिरा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा