Admin
ताज्या बातम्या

कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूंवरुन सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला खडसावलं

दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून आलेल्या चित्यांपैकी तिसऱ्या चित्याचा मृत्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून आलेल्या चित्यांपैकी तिसऱ्या चित्याचा मृत्यू झाला आहे.गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या सप्टेंबर महिन्यात नामिबियातून विशेष विमानाने चित्यांना भारतात आणण्यात आले होतं. 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते होते. ग्वाल्हेरमधून चित्यांना हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. तिथून चित्त्यांची कुनो नॅशनल पार्कमध्ये करण्यात आली.

दोन महिन्यात तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्याने सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे.मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच खडसावलं आहे.

केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही. एकाच ठिकाणी ठेवल्यास त्यांना धोका होऊ शकतो. चित्ते बऱ्याच काळानंतर भारतात आणले गेले. त्यांच्यासाठी त्यांचा पर्यायी अभयारण्यात बंदोबस्त करण्याचा विचार व्हायला हवा. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठानं म्हटले की, किडनीच्या आजारानं ग्रस्त असलेली मादी चित्ता भारत सरकारनं का स्विकारली? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा