शाळकरी मुलांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात शाळकरी मुलांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात
ताज्या बातम्या

Big Breaking News : शाळकरी मुलांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; १ विद्यार्थी ठार, अनेकजण जखमी

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- मोलगी रस्त्यावरील देवगोई घाट परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली एक स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली.

Published by : Riddhi Vanne

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- मोलगी रस्त्यावरील देवगोई घाट परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली एक स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. बस पूर्णपणे चांगलीच डॅमेज झाली असून, घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू आहे. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बसमध्ये अंदाजे २० ते ३० विद्यार्थी होते. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे असल्याची माहिती मिळाली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळेला परत येण्यासाठी दोन बस येऊन विद्यार्थ्यांना घेऊन जात होत्या, त्यातील एका बसचा अपघात झाला.

अद्याप अपघाताचं कारण स्पष्ट झालेलं नाही, पण बसचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये दोन ते तीन विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याचं समोर येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा