येत्या काही दिवसांत गणेशोत्सव येतोय. त्यासाठी घरोघरी आतापासून तयारी सुरू झाली आहे. एवढचं नव्हे तर तर दुसरीकडे गणेश मंडळांचीही लगबग सुरू झाली आहे. मात्र मूर्तींच्या विसर्जनाबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यादरम्यान आता पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे.
शाडूच्या मूर्तीमुळे नैसर्गिक जल स्रोत बुजून जाण्याची अधिक भीती दर्शवण्यात येत आहे. यासंदर्भातील उच्च न्यायलात याचिका दाखल करणार असल्याच म्हटलं जात आहे. शाडूच्या मातीमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं आहे.
तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये दोन रासायनिक संयुगे तर शाडू मातीत आठ रासायनिक संयुगे असतात. त्याचसोबत सिलिका , लोह, अल्युमिनियम, मॅग्नीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम यासारखी आठ खनिज्यांचा समावेश असतो. शाडूच्या माती पाण्याखालील गाळ वाढवण्यात मदत करत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे.