Seat sharing formula of Thackeray brothers' alliance in municipal elections : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांमध्ये युती आणि आघाडीबाबत चर्चा सुरू झाल्या असून, जागावाटपासाठी नेत्यांच्या बैठका होत आहेत. यंदा ठाकरे बंधू एकत्र लढत असल्यामुळे मराठी मतदारांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे बंधूंमधील मुंबईतील काही विधानसभा क्षेत्रांतील जागावाटपाचा आराखडा समोर आला आहे.
बोरिवली विधानसभा
मनसेने सुरुवातीला वॉर्ड 14 आणि 18 मागितले होते. चर्चेनंतर मनसेला वॉर्ड 14 आणि 9 मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाला वॉर्ड 16 आणि 18 अपेक्षित असून, वॉर्ड 13, 15 आणि 17 संदर्भात अजून निर्णय झालेला नाही. वॉर्ड 18 मधून शिवसेना (उद्धव गट) कडून पांडुरंग देसाई यांचे नाव पुढे येत आहे.
मागठाणे विधानसभा
मनसेने या भागात वॉर्ड 14, 4, 5, 12 आणि 26 यांची मागणी केली होती. त्यापैकी वॉर्ड 3 आणि 11 मनसेला दिले जाण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे गट वॉर्ड 25, 5, 4 आणि 12 यावर विचार करत आहे.
वॉर्ड 5 साठी उदेश पाटेकर, वॉर्ड 4 साठी राजू मौला, तर वॉर्ड 12 साठी शशिकांत झोरे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र वॉर्ड 5 बाबत दोन्ही पक्षांमध्ये अजूनही मतभेद आहेत.
कांदिवली पूर्व विधानसभा
मनसेने वॉर्ड 23, 26 आणि 36 मागितले होते. त्यातील वॉर्ड 23 मनसेला मिळाल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे गटाने वॉर्ड 26, 28, 29 आणि 44 यांची मागणी केली आहे. वॉर्ड 24 , 27 आणि 45 बाबत अजूनही चर्चा सुरू आहे.
चारकोप विधानसभा
मनसेने वॉर्ड 20, 21, 22, आणि ३१ यावर दावा केला होता. त्यापैकी वॉर्ड 21 , 22 आणि 31 मनसेकडे जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाला वॉर्ड 19 आणि 20 हवे आहेत. वॉर्ड 30 बाबत अजून तोडगा निघालेला नाही.
मालाड पश्चिम विधानसभा
मनसेने वॉर्ड 46 मागितला होता आणि तो वॉर्ड त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे गटाला वॉर्ड 32 , 33 , 47 , 48 आणि 49 मिळण्याची शक्यता आहे.
वॉर्ड 34 आणि 35 संदर्भात चर्चा अजून सुरू आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीतील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असून, उरलेल्या वॉर्ड्सवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात
पालिका निवडणूका जाहिर होताच, युती आणि आघाडी दोन्ही पक्षातील नेत्यांच्या जागा वाटपा संदर्भात बैठका सुरू होत्या
मराठी माणूस हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदा दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढवणार
ठाकरे बंधुंच्या जागा वाटपाच्या सहा विधानसभा क्षेत्रातील फाॅर्म्युला ठरला ?