ताज्या बातम्या

SEBI चा मोठा निर्णय; मध्यस्थांसाठी ‘@valid’ UPI हँडल 1 ऑक्टोबरपासून अनिवार्य

सेबीने सुरळीत आर्थिक व्यवहारांसाठी UPI हँडल अनिवार्य केले

Published by : Team Lokshahi

भारतीय बाजार नियामक संस्था SEBI सर्व नोंदणीकृत मध्यस्थांसाठी ज्यात ब्रोकर्स आणि म्युच्युअल फंड Mutual fund कंपन्यांचा समावेश आहे. SEBI ने एकच UPI हँडल Handle वापरणे अनिवार्य केले आहे. यामुळे गुंतवणूकदार केवळ अधिकृत आणि प्रमाणीकरण झालेल्या संस्थांकडेच रक्कम पाठवू शकतील. "ही प्रणाली सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक आर्थिक व्यवहारांसाठी मदत करेल," असे सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

नवीन UPI हँडल 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. उदाहरणार्थ, एखादी ब्रोकरेज कंपनी जर ‘abc’ नावाने नोंदणीकृत असेल, तर तिचा UPI हँडल Handle abc.bkr@validhdfc असा असेल. गुंतवणूक करताना अधिकृत संस्थेकडे पैसे पाठवले जात आहेत याची ओळख पटावी यासाठी, अशा व्यवहारांमध्ये 'हिरव्या त्रिकोणात अंगठा वर' असलेले चिन्ह दिसेल. सुमारे 8,000 इंटरमीडिएटर्स Intermediaries या नव्या प्रणालीत समाविष्ट होणार आहेत.

हे नवीन UPI हँडल केवळ इंटरमीडिएटरसाठी बंधनकारक आहे; गुंतवणूकदार मात्र त्यांच्या अगोदरच्याच UPI आयडीचाच वापर करू शकतात. दररोज ₹5 लाखांपर्यंतचे व्यवहार UPI द्वारे करण्याची मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहील. याशिवाय, व्यवहार करण्यापूर्वी UPI ID खरा आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘सेबी चेक SEBI check’ नावाची नवीन सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये वापरकर्ते UPI ID टाकून किंवा QR कोड स्कॅन करून तपासणी करू शकतील.

सुरक्षित गुंतवणूक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने सेबीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. गुंतवणूकदारांनी फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केवळ अधिकृत UPI हँडलचाच वापर करावा, तसेच 'सेबी चेक SEBI check' सारख्या सुविधांचा योग्य वापर करून व्यवहार करताना दक्षता घ्यावी. वित्तीय व्यवहार अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक करण्यासाठी या नव्या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेबीने केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी