ताज्या बातम्या

Atal Setu Bridge: अटल सेतूवर दुसरी आत्महत्या; समुद्रात उडी घेत तरुणाची आत्महत्या

मुंबईमधील अटल सेतु (एमटीएचएल) वरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईच्या अटल सेतूवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईमधील अटल सेतु (एमटीएचएल) वरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी 24 जुलैला दुपारी 12 वाजता ही घटना घडली आहे. अटल सेतूवरील ब्रिजवर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

अटल सेतूवरून आत्महत्येची ही दुसरी केस आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. करुतुरी श्रीनिवास असे या इसमाचे नाव असून तो खासगी नोकरीस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टाटा nexon कार क्रमांक MH 05 EV 0849 ही त्याने अटल सेतूवरच ठेवली आणि स्वतःला खवळलेल्या पाण्यात झोकून दिले.

श्रीनिवास याला शोधण्यासाठी शोध पथके रवाना झाली आहेत. न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आता ही दुसरी आत्महत्याची घटना दाखल झाली. श्रीनिवास यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले ? याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, मात्र न्हावा शेवा पोलिसांमार्फत या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा