Yasin Malik Team Lokshahi
ताज्या बातम्या

यासीन मलिकला शिक्षेमुळे मोठा दहशवादी हल्लाचा कट

सुरक्षा एजन्सीला 6 ते 7 संवेदनशील अलर्ट

Published by : Team Lokshahi

नवी दिल्ली :

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासीन मलिक (Yasin Malik)याला दिल्लीतील एनआयए न्यायालयाने (NIA Court) जन्मठेपेची शिक्षा दिली. दोन प्रकरणात दोन जन्मठेप दिली आहे. यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट मिळाला आहे.

माहितीनुसार, सुरक्षा एजन्सीला 6 ते 7 संवेदनशील अलर्ट मिळाले आहेत. ज्यामध्ये यासिन मलिक याच्या शिक्षेच्या निषेधार्थ दिल्ली एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, असे लिहिले आहे.

यासीन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवल्याच्या दिवसापासून दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना सतत अलर्ट मिळत आहे. ज्यामध्ये यासीन मलिकला दोषी ठरवल्याच्या निषेधार्थ, त्याच्या कट्टर समर्थक आणि त्याच्या जवळच्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांनी दिल्ली एनसीआरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी हल्ल्याची योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे.

यांनाही शिक्षा

10 मे रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, स्वातंत्र्याच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी मलिकने जगभरातून निधीच्या नावाखाली पैसे घेतले. फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह अब्दुल रशीद शेख, नवल किशोर कपूरसह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आता भाषेनंतर जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक