ताज्या बातम्या

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

यातच 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर यापुढे जास्त बंदोबस्त वाढवण्यात ठेवण्यात येणार असून पनवेलच्या फार्महाउस बाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सतर्क झालेले दिसून येत आहेत. सुरक्षा बाबत आज आयुक्तांकडून आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?