ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार होती. मात्र आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही दुसऱ्यांदा स्थागित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. सिनेट निवडणूक रद्द केल्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असून सिनेट निवडणूक अचानक रद्द केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सिनेट निवडणूक उद्याच घेण्याची अभाविपची मागणी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Latest Marathi News Update live : नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी