दसरा हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी रामाने रावणाचा वध केला. श्रीरामाच्या चांगुलपणाने रावणाच्या वाईट कृत्यांवर विजय मिळवला, म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन शुद्ध विजयादशमी दसरा आहे. दरम्यान दसरा सण आनंद, सुख आणि सकारात्मक्ता वाटण्याचा असतो, दरम्यान दसऱ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना Whatsapp Status, Facebook द्वारे पाठवा 'या' शुभेच्छा पाठवा...
झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणवार
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
आंब्याच्या पानांची केली कमान
अंगणात काढली रांगोळी छान
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा
आपट्याची पाने देऊन करा साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
दारात झेंडूचे तोरण लावून
रांगोळीमध्ये रंग भरू
गोडधोडाचा नैवेद्य करुन
अस्त्र, शस्त्रांचे पूजन करु
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!