ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्याचसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या पक्षप्रवेशाला उपस्थितीत होते.
यावेळी अण्णासाहेब डांगेंसह त्यांची दोन मुल चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अण्णासाहेब डांगे यांनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. त्यानंतरच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये परतले आहेत.