पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी विरोधात काल जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो गुन्हा अत्यंत कमकुवत असल्याचा आरोप ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार यांनी केला आहे. फक्त आय जी आर नाही तर सर्व संबंधित विभागांनी एकत्र मिळून अमेडिया विरोधात फसवणुकीचा गुन्हा गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी अतिशय कमकुवत गुन्हा आय जी आर विभागाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात उर्वरित यंत्रणा आता कशाची वाट पाहत आहेत असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.