ताज्या बातम्या

Maharashtra Politics : ठाकरेसेनेचे जेष्ठ नेते दगडू सकपाळ शिवसेनेत करणार प्रवेश...

ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ आणि नाराज नेते दगडू दादा सकपाळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार असून, ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ आणि नाराज नेते दगडू दादा सकपाळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश आज सकाळी १० वाजता मुंबईतील नंदनवन येथे पार पडणार असून, दगडू दादा सकपाळ यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दगडूPartyJoining सकपाळ हे ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही काळापासून ते पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पक्षात योग्य सन्मान न मिळणे, निर्णयप्रक्रियेतून डावलले जाणे आणि संघटनात्मक पातळीवर दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दगडू सकपाळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर दगडू दादा सकपाळ शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा अधिकच बळावली होती. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, दगडू सकपाळ ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या संभाव्य संयुक्त राजकीय हालचालींच्या आधीच हा पक्षप्रवेश होत असल्याने, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. एकीकडे ठाकरे गट पक्ष मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना, दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांचा पक्षातून बाहेर पडणे ही बाब पक्षासाठी चिंतेची ठरत आहे.

दरम्यान, शिंदे गटासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने हा मोठा टप्पा ठरू शकतो. दगडू दादा सकपाळ यांच्या प्रवेशामुळे काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. आज सकाळी होणाऱ्या या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, यानंतर राजकीय समीकरणांमध्ये नेमके कोणते बदल घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा