डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टॅरिफच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर झाल्याच समोर आलं. मागील काही दिवस अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांना बसला. तसेच याचा फटका भारतीय शेअर मार्केटला देखील बसलेला पाहायला मिळाला. याचा परिणाम भारतीय गुंतवणुकदारांवर देखील झाला असून त्यांना खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
शेअर मार्केटमध्ये रिकव्हरी
याचपार्श्वभूमिवर आता ट्रम्प टेरिफच्या भीतीवर मात करत भारतीय शेअर मार्केट मंगळवारी रिकव्हरी मोडमध्ये दिसला. सोमवारी मोठ्या घसरणीचा सामना केल्यानंतर, शेअर मार्केट उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या 30 समभागांच्या सेन्सेक्सने 1200 अंकांची उसळी घेतली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 390 अंकांच्या जोरदार उसळीसह व्यवहाराला सुरुवात केली.
रेड झोन शेअर्स ग्रीन झोनमध्ये आले
दरम्यान, टाटा स्टील, टाटा मोटर्सपासून अदानी पोर्ट्सपर्यंतचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. तसेच शेअर बाजारात GIFT निफ्टीची 300 अंकांची वधारला असून प्री ओपनिंगला निफ्टीतही दीड टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. एवढचं नाही तर सोमवारी आशियाई बाजारात 10% घसरण झाल्याची माहिती समोर आली होती. आता आशियाई समभागांनी देखील पुन्हा उसळी घेतली आहे.