Maharashtra Accident News : सणासुदीच्या काळात अपघातांची मालिका; 13 जखमी तर 5 ठार, कुठे किती अपघात झाले जाणून घ्या... Maharashtra Accident News : सणासुदीच्या काळात अपघातांची मालिका; 13 जखमी तर 5 ठार, कुठे किती अपघात झाले जाणून घ्या...
ताज्या बातम्या

Maharashtra Accident News : सणासुदीच्या काळात अपघातांची मालिका; 13 जखमी तर 5 ठार, कुठे किती अपघात झाले जाणून घ्या...

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या भीषण अपघातांच्या मालिकेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 13 जण जखमी झाले आहेत.

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या भीषण अपघातांच्या मालिकेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 13 जण जखमी झाले आहेत. यामध्ये मुंबईहून आलेल्या एका नवरीचाही समावेश आहे. दिवाळीच्या सणाच्या आनंदात काही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

उमरगा तालुक्यातील डाळिंब गावाजवळ मुंबई-हैदराबाद महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ हैदराबादकडे जाणाऱ्या ग्रँड विटारा आणि सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या सफारी कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत ग्रँड विटारामधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकांच्या बेपर्वाईमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड-हिंगोली मार्गावर मुंगसाजी नगर येथे पिकअप आणि लक्झरी वाहनाची टक्कर होऊन सात शेतकरी जखमी झाले. हे सर्व शेतकरी झेंडूची फुले विकून आपल्या गावी परतत असताना अपघात झाला. जखमींना रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, इगतपुरी येथे मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटे कार आणि आयशर ट्रक यांच्यात अपघात झाला. या धडकेत कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.

कुठे किती अपघात झाले...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून आलेली निकिता सावंत या तरुणीचा बस-दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तिचं लग्न येत्या फेब्रुवारीत होणार होतं. बीड जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात एसटी बसने मागून ट्रकला आणि नंतर तीन जनावरांना धडक दिली, यात एक जनावर जागीच दगावलं. पुण्यातील भोर परिसरात नसरापूरजवळ रस्त्याच्या खड्ड्यांमुळे टेम्पो उलटून अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, पण शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा