दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षातच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद निर्माण झालेत. काही नेते या निर्णयाला पाठिंबा देत असले तरी, काही वरिष्ठ नेते त्याला ठाम विरोध करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून विरोध होतं असल्याची चर्चा सुरू असून विलिनीकरणाला अजित पवारांची मात्र पसंती असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावेळी ते म्हणाले की, "राजकिय नेते, प्रश्न विलीनीकरणाची चर्चा वरिष्ठ पातळीवरच होणार आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले, अशी प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावना आहे. दोन्ही पक्षामध्ये विरोधाभास नाही, विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय आदरणीय शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे वरिष्ठ नेते घेतील. "