Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या उद्या पासून सलग 5 दिवस बैठका होणार आहेत. आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक, 3 ते 7 नोव्हेंबरला मुंबईतील वरळी डोम येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रावादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी आढावा बैठक दिनांक ३, ४, ५, ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी वरळी डोम (मुंबई) येथे आयोजित करण्यात आली आहे.