धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथे दुभाजकाला धडकून अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तांबे कुटुंबीय पंढरपूरला देव दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला. या अपघातात 8 जण जखमी झालेत. दरम्यान अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.