ताज्या बातम्या

Sex scandal Karad: कराडमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश

आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्याव्यवसाय चालवते असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्याव्यवसाय चालवते असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेंभूतील छत्रछाया वृद्ध व निराधार आश्रमातील धक्कादायक प्रकार आहे. निराधार मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा रेखा सकटवर आरोप करण्यात आला आहे.

आश्रम शाळेतील अनेक मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. सेक्स स्कँडलमध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे. एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही सेक्स स्कँडलमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. लोकशाही मराठीकडं खात्रीलायक माहिती आहे. रेखाच्या आश्रमात यापूर्वी अनेक मुली असल्याची माहिती लोकशाहीला मिळाली आहे.

वेश्याव्यवसायास नकार दिल्यानंतर रेखा मारहाण करत होती. रेखा सकट हिच्याकडून आश्रमातील मुलींची पिळवणूक करण्यात आली आहे. आश्रमात मुलीकडून हातापायांची मालिश करुन घ्यायची. मालिश करतानाचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेला आहे. आश्रमाला लागून रेखा सकट हिचं किराणा दुकान असल्याची माहिती मिळाली. पण त्या दुकानात किराणा सामानाच्या नावाखाली दारुविक्री सुरु होती. दुकानातील बरण्यांमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट