ताज्या बातम्या

धक्कादायक! डॉक्टरानेच केले नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार

पीडितेचा गर्भपात करत अर्भक पुरले जमिनीत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

गोपाळ व्यास | वाशिम : जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला (Medical Field) काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टराने आपल्याच रुग्णालयातील एका महिला नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गोपाल इंगोले असे आरोपीचे नाव आहे. डॉक्टरने केलेल्या लैंगिक अत्याचाराने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील इंगोले बाल रुग्णालयातील डॉ. गोपाल इंगोले याने स्वतःच्या रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे पीडिता अनैतिक संबधांमुळे गर्भवती राहिली असता आरोपीने महिलेचा गर्भपात केला व अर्भक जमिनीत पुरले.

या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी तो पुरलेला अर्भक बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. डॉक्टर इंगोले याने महिलेच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर विविध चर्चेला उधाण आले असून रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास उठतो की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा