ताज्या बातम्या

Fake Paneer : शाहरुख खानच्या बायकोच्या हॉटेलमधील पनीर नकली ? Video Viral

शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या हॉटेलमधील पनीर निघाले नकली

Published by : Shamal Sawant

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या खूप चर्चेत आली आहे. गौरी खानचे अनेक व्यवसाय आहेत. त्यातील एक व्यवसाय म्हणजे रेस्टॉरंटचा व्यवसाय. मात्र आता या रेस्टॉरंटमुले गौरी खान चांगलीच अडचणीत आली आहे. गौरी चालवत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी वापरले जाणारे पनीर हे बनावटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडिया इंफ्लूएन्सर सार्थक सचदेवाने एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो सेलिब्रिटीजच्या रेस्टॉरंटमध्ये जावून पनीरची गुणवत्ता तपासत होता. सर्वात आधी तो विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पनीर राईस ऑर्डर करतो. त्यावेळी तो पनीर बाजूला काढून त्यातील आयोडीन चेक करतो आणि यामध्ये तेथील पनीरची गुणवत्ता चांगली निघते. त्यानंतर तो शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये जातो तेथील पनीरची गुणवत्ता तपासली. तेथील पनीरची गुणवत्तादेखील चांगली निघाली. बॉबी देओलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊनदेखील पनीरची गुणवत्ता तपासतो आणि तेथील पनीरदेखील चांगले निघते.

यानंतर तो गौरी खानच्या नवीन रेस्टॉरंट 'तोरी'मध्ये जातो. इथे तो पनीरची काही फॅन्सी डिश ऑर्डर करतो. येथील पनीर बनावट असल्याचा दावा करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. या व्हिडिओला 5.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ रेस्टॉरंटच्याही नजरेस पडला. यावर रेस्टॉरंटने प्रतिक्रिया दिली. 'आयोडीन चाचणीमध्ये स्टार्चची उपस्थिती दिसून येते. यावरून पनीरची गुणवत्ता तपासता येत नाही. आम्ही रेस्टॉरंटमध्ये सर्व चांगल्या गुणवत्तेचे पदार्थ वापरतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी