विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि नवे सरकार देखील स्थापन झालं आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांच लक्ष हे महानगरपालिकांच्या निवडणुकांवर आहे. याचपार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक लढण्याचा मुद्दा घेऊन शंभूराज देसाई म्हणाले की, उबाठा एवढ्या बॅकफूटवर गेली आहे, तिला शिवसेना म्हणु नका... शिवसेना आमची आहे, शिवसेना पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे घटनेनं आणि कायद्यानं आमच्याकडे आलेलं आहे. त्यांची शिवसेना उबाठा आहे....
मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकलेला दिसेल- शंभूराज देसाई
पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, त्यांचा सभागृहांमध्ये 50 सुद्धा आकडा नाही आहे.. त्यांच्यातला एक पक्ष वेगळी भूमिका मांडायचा तर दुसरा पक्ष वेगळी भूमिका मांडायचा. त्यामुळे एकमेकांच्या माथ्यावर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. विधानसभेत या तिन्ही पक्षांचे एकमत नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांना अपयश आलं आहे आणि आता त्यांचे त्यांना कळेना झालं आहे. त्यामुळे त्यांच त्यांना काय करायचं आहे ते लखलाभ असू देत. मुंबई महानगरपालिकासाठी आमच ठरलं आहे, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. महायुतील तिघांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकलेला दिसेल, असं विधान शंभूराज देसाई यांनी केल आहे.
जेष्ट नेत्याचे पंख छाटण्याचे काम, सर्व खाते समान आहेत- शंभूराज देसाई
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष राज्य खातेवाटपाकडे वेधलं होतं आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे यादरम्यान खाते वाटपामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर विरोधकांडून यावर आरोप प्रत्यारोप करण्यावरून शंभूराज देसाई यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळेस शंभूराज देसाई म्हणाले की, विरोधकांना जो आरोप करायचा आहे तो करू द्या, पण सर्व खाती सारखे आहेत. कोणताही खाती मंत्रिमंडळाचे संयुक्तिक जबाबदारी आहे. कोणताही खाते हेवी वेट नाही सर्व समान आहेत.