ताज्या बातम्या

शरद पवार-अजित पवार भेट, वळसे पाटील म्हणाले 'काही राजकीय चर्चा...'

राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Published by : shweta walge

राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली. यानंतर अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरच अजितदादा आणि शरद पवार यांची भेट घरगुती कार्यक्रम होता त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात काहीं राजकीय चर्चा होत नसते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, अजितदादा काल दिल्लीला गेले त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. दिड तास त्यांच्यात चर्चा झाली. काय चर्चा झाली आहे हे अजित दादा भेटल्याशिवाय मला समजणार नाही. मात्र चाललंय ते सर्व व्यवस्थित चाललं आहे. काही काळजी करायच कारण नाही तिन्ही पक्ष हे एकमेकांशी सामंजस्य राखून काम करत आहे.

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्या असेल. तर लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडेल व शरद पवार हे मोदी सोबत येऊन सरकार मजबूत करेल. तसेच आगामी काळात काँग्रेससह अनेक नेते मोदींना पाठींबा देतील व विरोधी पक्षात कमी लोक राहतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला, संजय शिरसाटांच्या व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

तुम्हीसुद्धा पाणीपुरीचे तिखट पाणी आवडीने पिता का? तर मग 'हे' वाचाच

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई