Sharad Pawar Lokshahi
ताज्या बातम्या

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी 'तुतारी' फुंकली, म्हणाले; "महाविकास आघाडी २८८ पैकी..."

भाजपचे उद्गीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला.

Published by : Naresh Shende

Sharad Pawar Speech: भाजपचे उद्गीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशादरम्यान शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना मोठं विधान केलं केलं. पवार म्हणाले,राज्य बदलायचा निकाल लोकांनी घेतला आणि ४८ पैकी ३१ जणांना विजयी केलं. राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ लोकांना निवडून दिलं. याचा अर्थ असा आहे की, ही सुरुवात आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल. त्यावेळी २८८ जागांपैकी २२५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल, असं चित्र आहे. पुढील काळात राज्यात आमची सत्ता येईल. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. देशात महाराष्ट्राला प्रगत राज्य बनवायचं आहे.

पवार पुढे म्हणाले,आज पक्षप्रेवशासंबंधीचा सोहळा आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते येत आहेत. विविध पक्षातून लोक येत आहेत. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती वाढवावी लागेल, हा विचार ज्यांच्या मनात आहे, असेही लोक पक्षात येत आहेत. पक्षाच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी राजकीय विचार सोबत घेऊन महाराष्ट्रात जबरदस्त शक्ती उभी करायला पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे फक्त ६ उमेदवार निवडून आले. राज्य बदलायचा निकाल लोकांनी घेतला आणि ४८ पैकी ३१ जणांना विजयी केलं. राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ लोकांना निवडून दिलं, असंही शरद पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ