राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बंडात अजित पवारांसोबत आहेत.
शरद पवार आता पुण्यामध्ये आहेत. सकाळी 8 वाजता शरद पवार कराडच्या दिशेने रवाना होतील. त्यानंतर 11 वाजता ते यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन 11.15 वाजता ते कराडहून साताराला रवाना होतील. त्यानंतर 3.30 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होतील.