थोडक्यात
साताऱ्यात मविआकडून काळी दिवाळी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर काळी दिवाळी आंदोलन
मविआच्या नेत्यांची जोरदार निदर्शने
साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नेते कार्यकर्त्यांकडून आज सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काळी दिवाळी आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आली. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आली. अतिवृष्टी त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ परिसरातील असणाऱ्या पूर परिस्थिती त्याचबरोबर शेतकऱ्यांना अद्यापही सरकारने वाऱ्यावर सोडल्याने या सर्व घटनांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जोरदार निदर्शने केली.