गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरुन ठेवला आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे. अजित पवारांना सोबत घेण्याबाबत शरद पवारांनी नकारघंटा वाजवली आहे.
त्याचसोबत जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना सोबत घेऊ आणि संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार अजित पवारांसोबत जाणार नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.