admin
ताज्या बातम्या

रात्रभर पोलिस आक्रमक : पवारांच्या घरावर हल्ला ते सदावर्तेंना अटक अन् आझाद मैदानावर कारवाई

Published by : Jitendra Zavar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘सिल्व्हर ओक’वर ( Silver Oak) एसटी कर्मचाऱ्यांनी (st strike) शुक्रवारी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांची कारवाई रात्रभर सुरु होती. पोलिस व गुप्तचर यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरु झाले. पोलिसांची कारवाई रात्रभर सुरु होतीी. कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी रात्री अटक केली. त्यानंतर मध्यरात्री आझाद मैदानातून आंदोलकांना पोलिसांनी बाहेर काढले. पवारांच्या घरावर हल्ला ते सदावर्तेंना अटक अन् आझाद मैदानावर कारवाई असे काल पासून काय घडले ते जाणून घेऊ या....

दुपारी आंदोलन

मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली. आंदोलकांची संख्या सुमारे १०५ होती, त्यात ३४ महिला होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. एसटी संपकाळात आत्महत्या केलेल्या १२० एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे काय, असा प्रश्न आंदोलक विचारत होते. महिला आंदोलकांनी या वेळी पवारांच्या निवासस्थानासमोर बांगड्या फोडल्या.

सुप्रिया सुळेंचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवासस्थानाबाहेर आल्या. त्या म्हणाल्या, आता या क्षणाला मी आंदोलकांशी बोलायला तयार आहे. पण त्यांनी शांत राहावं.

पोलिसांची कारवाई

पोलिसांनी १०७ आंदोलकांवर रात्री गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये रात्री गुन्हे दाखल झाले असून सर्वांना अटक केली आहे. त्यामध्ये १०५ आंदोलक सिल्व्हर ओकवरचे असून दोन आंदोलक आझाद मैदानावरचे आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांना अटक

वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी रात्री १० वाजेच्याा सुमारास अटक केली. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्तेंना जे.जे. रुग्णालयात नेले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लावण्यात आलेले कलमं हे अजामीनपात्र असून, त्यांना आज जामीन मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

आझाद मैदानावरील आंदोलकांवर कारवाई

रात्रभऱात मोठ्या प्रमाणात घडामोडींना वेग आला. पोलिसांनी आझाद मैदानावरून आंदोलनकर्त्यांना हुसकाले. आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी सुरू केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.

आता सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या

आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे.

गोपनीय शाखेचं अपयश

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक हे सिल्व्हर ओकच्या दिशेने येतील आणि असा हल्ला करतील हे मुंबई पोलिसांना समजू शकले नाही, याचा अंदाज त्यांना आला नाही, यावरुन हे मुंबई पोलिसांच्या गोपनीय शाखेचं अपयश असल्याचं म्हटलं जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा