ताज्या बातम्या

अदानींना जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय - शरद पवार

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योग समुहावर एक वक्तव्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवाल-अदाणी प्रकरणात जेपीसी चौकशीची आवश्यकता नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची नियुक्त करा. जर संसदेची समिती नियुक्त केली, तर आज संसदेत बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे. असे पवार म्हणाले.

पत्रकार परिषद घेत शरद पवार म्हणाले की, या प्रकरणात जेपीसी गठीत करुन काहीच उपयोग नाही आहे. अदानींना जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय. मा सरसकट विरोध करत नाही. कुठलीतरी परदेशातील कंपनी इथल्या कंपनीवर भूमिका घेते. त्याला किती महत्व द्यायचे हे आपण ठरवलं पाहिजे. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती अधिक विश्वसनीय. या कमिटीमध्ये विरोधकांचे सदस्य कमी, सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असतील. याप्रकरणाची चौकशी नीट करावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. असे शरद पवार म्हणाले.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा