राज्याचे मुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रमुख शरद पवार आणि शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करत त्यांच्या पाठिंब्यासाठी विनंती केली होती. ही विनंती उपराष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा यासाठी करण्यात आली होती. दरम्यान, विरोधी आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शदर पवार आणि उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनकॉलवरुन शरद पवार पत्रकार परिषदेत स्पष्टच बोलले, त्याचसोबत त्यांनी निवडणुक आयोगावर नाराजी व्यक्त करत राहुल गांधींचे कौतूक केले.
याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला फोन आला तुम्ही NDA च्या उमेदवारांना मत द्या अशी विनंती केली. त्यांच कारण आहे ते महाराष्ट्रचे राज्यपाल आहेत. आम्ही त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण ते आमच्या विचारांचे नाहीत. आम्ही बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे".
"सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असताना झारखंडच्या मुख्यमंत्री हेमंत सुरेन यांना अटक झाली होती. उपराष्ट्रपतीपदासाठी आमच्याकडे मतं कमी असली तरी आम्हाला त्याची चिंता नाही. असे उमेदवार, ज्यांच्या राज्यभवनात मुख्यमंत्र्यांना अटक होते, आणि सत्तेचाही दुरुपयोग आहे", असे म्हणत एनडीए आघाडीच्या उमेदवारांवर शरद पवारांनी खोचक टीका केली.
पुढे राहुल गांधींचे कौतूक करत आणि बिहार निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "सध्या राहुल गांधींकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप होत आहेत. कारण, निवडणूक आयोग त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत नाही. राहुल गांधींनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा देखील सुरू आहे, ज्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे".