silver oak सिल्व्हर ओक admin
ताज्या बातम्या

शरद पवारांचा घरावर हल्ला :आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. DCP झोन २ योगेश कुमार (Yogesh Kumar) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे.

शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी संपकरी एसटी कर्मचारी (St Strike) यांनी चप्पलफेक व दगडफेक करत आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मोठा राडा झाला होता. आक्रमक आंदोलनवेळी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत DCP झोन २ योगेश कुमार (Yogesh Kumar) यांना शनिवारी त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. तर योगेश कुमार यांच्या जागी डीसीपी, डिटेक्शन, नीलोत्पल यांना झोन II चा प्रभार देण्यात आला आहे. त्यानंतर आता गामदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजभर यांनाही हटवण्यात आले आहे. याआधी या घटनेनंतर पोलीस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा