Shefali Iariwala Husband Paragt Yagi Carries : काटा गर्ल शेफाली जरीवालाच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. 42 वर्षीय शेफालीला शुक्रवारी रात्री उशीरा ह्रदयविकाराच्या झटाक्याने तिचं निधन झाले, परंतू अशा अचनाक जाण्याने पोलिसांना संशय होता. मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तिचा मृत्यदेह शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालासाठी पाठवण्यात आला होता. आज सकाळी 7 वाजता पती पराग त्यागीने स्मानभूमीतून शेफालीच्या अस्थी आणल्या. त्यावेळेस परागचे अश्रु अनावर झाले आहे.
शेफाली आपल्या पती पराग त्यागीसोबत अंधेरीत लोखंडवाला संकुलात राहत होते. शुक्रवारी रात्री अचानक शेफालीला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने तिला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, दरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. संध्याकाळी सायंकाळी ७ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावून शेफालीला अखेरचा निरोप दिला. सकाळी 7 वाजता ओशीवरा स्मानभूमीतून शेफालीच्या अस्थी आणल्या. त्यावेळेस अस्थी जवळ घेत पराग ठसाठसा रडला. त्याचे अश्रु अनावर झाले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून नक्कीच डोळ्यांत पाणी आले असेल.
हेही वाचा...