Shiekh Hasina Google
ताज्या बातम्या

बांगलादेशात राजकीय उलथापालथ! पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन हसीना शेख भारतात दाखल, लष्कराने घेतला ताबा

बांगलादेशात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकरीच्या आरक्षणातील कोट्याविरोधात आंदोलनाचा भडका उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Published by : Naresh Shende

Sheikh Hasina Resigns As Prime Minister In Bangladesh: बांगलादेशात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकरीच्या आरक्षणातील कोट्याविरोधात आंदोलनाचा भडका उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात परिस्थिती अस्थिर झाल्यानं शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या भारतात दाखल झाल्या, अशी माहिती समोर येत आहे.

बांगलादेशमध्ये अराजकता सुरु झाल्यानं शेख हसीना यांनी त्याचे ढाका येथील निवासस्थान सोडलं. त्यानंतर लष्कराने बांगलादेशचा ताबा घेतला आहे. बांगलादेशची परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना थोड्याच वेळात त्रिपुरामध्ये दाखल होणार आहेत. आगरताला विमानतळावर त्यांचं हेलिकॉप्टर लँड होणार आहे. बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार आहे. तसच बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी ताबा घेतला आहे.

बांगलादेश पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एएनआयला माहिती दिलीय. बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन सुरु असल्यानं पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका येथील अधिकृत निवासस्थान सोडलं आहे. त्यांची सध्याच्या ठिकाणाबाबत अद्याप काही सांगता येत नाही. ढाकामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. ढाका येथील पंतप्रधान कार्यालयाला लोकांनी घेराव घातला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी