Shikhar Dhawan 
ताज्या बातम्या

धवननं यशाचं उंच 'शिखर' गाठलं! 'IPL'मध्ये रचला इतिहास, 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला फलंदाज

विशेष म्हणजे या सामन्यात शिखर धवनने ऐतिहासिक कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासात शिखर धवनच्या नावावर नवीन विक्रमाची नोंद झालीय.

Published by : Naresh Shende

Shikhar Dhawan Record In IPL 2024 : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगला. दिल्लीने पंजाबला १७५ धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर तसंच लियाम लिविंगस्टनसोबत केलेल्या ६७ धावांची भागिदारीमुळं पंजाबने १९.२ षटकात ६ विकेट्स गमावून १७७ धावा केल्या अन् सामन्यात विजय संपादन केलं. विशेष म्हणजे या सामन्यात शिखर धवनने ऐतिहासिक कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासात शिखर धवनच्या नावावर नवीन विक्रमाची नोंद झालीय.

शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरोधात मोठी खेळी केली नाही. परंतु, २२ धावांच्या खेळीच्या जोरावर शिखर धवनने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. धवन आयपीएलमध्ये ९०० चौकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. पंजाब किंग्जने आक्रमक सुरुवात करून तीन षटकांत ३४ धावा केल्या होत्या. त्यावेळी शिखर धवन १६ चेंडूत २२ धावांवर असताना त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर शिखर धवन बाद झाल्यानंतर पंजाबला मोठा धक्का बसला.

सॅम करनने ४७ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ६३ धावा केल्या. तर लिविंगस्टनने २१ चेंडूत नाबाद ३८ धावांची खेळी करुन पंजाबला विजय मिळवून दिला. लिविंगस्टनने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले.

विशेष म्हणजे सुमित कुमारच्या शेवटच्या षटकात लिविंगस्टनने गगनचुंबी षटकार मारून पंजाबला विजय मिळवून दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप