महापालिकेचे अधिकारी आणि ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे.
या मोर्चासाठी ठाकरे गटाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. यातच आता शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्समधून जन आक्रोश मोर्चा कशासाठी? असा सवाल विचारण्यात आला आहे.
या बॅनर्सवर शिंदे गटाचे नाव नाही. शिंदे गटाच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. यावर शिवालिक वेंचर पुनर्वसन प्रकल्प, सरकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीतील हक्काची घरे, बेहराम पाडा येथील चमडावाडी नाला प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे न मिळता आपल्याच नातलगांच्या नावावर घरे करणारे लोकप्रतिनिधी. असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.