राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर असून राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. राज्यातील महापालिका निवडणुका मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युती म्हणून लढणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच युती म्हणून या निवडणुका लढत आहेत. संजय राऊतांनी नुकताच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठे विधान केले. संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपाला जागा देत होती. आता काय पाळी आलीये… अमित शहांची स्वत: शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहवं लागतं. त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे. ही यांची शिवसेना आहे. यापूर्वी शिवसेना कधीही कोणाच्या दारात 60 वर्षांच्या इतिहासामध्ये जाऊन उभी राहिली नाही.
एकनाथ शिंदे यांचा गट पण जे स्वत:ला शिवसेना वगैरे म्हणून घेतात. ते युती व्हावीत म्हणून ते त्यांचे मालक अमित शहा यांच्या दारात गेले आणि आता त्यांना भारतीय जनता पक्षाने जागा दिल्या, लढा म्हणून. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजीरवाणे आहे. आम्ही शिवसेना आहोत.. आम्ही सन्मानाने आघाडीत गेलो आहोत. 140 च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत, हे आतापर्यंतचे चित्र आहे.
राज ठाकरे यांचाही पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढत आहे. एनसीपीला आम्ही जागा देत आहोत. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी.. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढत आहे.. आता याचा विचार जनता नक्की करेल. मला खूप आर्श्चय वाटले आणि वाईटही वाटले. शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पार्टीने फेकलेल्या जागांवर लढतायत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपाला जागा देत होती. पुढे बोलताना संजय राऊतांनी म्हटले की, बीजेपीला जागा देत होती. शिवसेनेच्या मर्जीने युती होत होती. तिथे एकनाथ शिंदेंसारखे लोक लाचार मराठी माणसाचे दर्शन घडवतायत. हे मराठी माणसाचे दुर्देव आहे. ज्या ज्यावेळी भाजपाने अशी भूमिका घेतली, त्यावेळी शिवसेना स्वाभिमानाने बाजूला झाली, असेही संजय राऊत यांनी म्हटले.