ताज्या बातम्या

Shirdi Devendra Fadnavis: श्रद्धा सबुरीचा मंत्र ज्यांना समजला ते यशस्वी झाला, नाही समजले ते...

भाजपच्या शिर्डी महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र समजणारे यशस्वी होतात, असे फडणवीस म्हणाले.

Published by : Prachi Nate

विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाला दणदणीत यश मिळाले त्यानंतर, आता भाजपाचं शिर्डीत महाअधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याचसोबत राज्यातील सर्व भाजप नेते हे देखील उपस्थित आहेत. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर 'ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला आपण पाहिलं', असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

श्रद्धा आणि सबुरीचा त्यांची हालत बुरी झाली...- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे कारण हे महाअधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतलं... कारण, आपल्या सगळ्यांना माहित आहे की, साई बाबांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा... श्रद्धा आणि सबुरीचा आपल्या भाजप पक्षात सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि स्वतः शेवटी म्हणजे सबुरी आहे.. हा मंत्र आपल्या जीवनात आपण सगळे सातत्याने पाळत असतो... ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले आणि ज्यांना समजला नाही त्यांची हालत बुरी झाली... हे आपण विधानसभा निवडणुकीत पाहिले आहे...

महाराष्ट्रात भाजपने एकट्याने १००पेक्षा जास्त जागा जिंकल्या...- देवेंद्र फडणवीस

पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मकर संक्रमण संपून महाकुंभाचे अमृत प्राप्त करण्यासाठी हजारो लोक एकत्रित येणार आहेत,अशावेळी महाविजयाचा आनंद आपण साजरा करत आहोत... महाराष्ट्रातील जनतेने तीन वेळा १००पेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला दिल्या...गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात सलग तीनवेळा १००हून अधिक जागा जिंकणारा भाजप एकमेव पक्ष आहे... गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगढ यांसोबत महाराष्ट्राने सलग तीनवेळा जिंकण्याची किमया केली आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा