ताज्या बातम्या

शिर्डीत फुल-प्रसादावरुन साई बाबा मंदिर परिसरात तणावाचं वातावरण; सुरक्षारक्षक अन् आंदोलकांमध्ये झटापट

शिर्डी येथील साई मंदिरात हार - फुल प्रसादावरील बंदी उठवावी या मागणीसाठी आज स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी हार फुलांसह साईंच्या दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधितांना सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. त्यामुळे विक्रेते आणि संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली.

Published by : Siddhi Naringrekar

शिर्डी येथील साई मंदिरात हार - फुल प्रसादावरील बंदी उठवावी या मागणीसाठी आज स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी हार फुलांसह साईंच्या दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधितांना सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. त्यामुळे विक्रेते आणि संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली.

कोरोना काळात शिर्डीच्या साई मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेण्यावर घालण्यात आलेली बंदी अद्यापही कायम आहे. मात्र या निर्णयाविरोधात आता सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन सुरु केलं आहे. साई मंदिरात हार फुले आणि प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी पायी येत द्वारकामाई समोर आंदोलन केले. साईबाबा संस्थानने कोणत्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचं कारण देत आंदोलन करू नये असं पत्र संजय काळे यांना दिलं असलं तरी त्यांनी सुद्धा पत्राला पत्राचे उत्तर देत आंदोलनावर ठाम असल्याच स्पष्ट केलं होतं.

विश्वस्त मंडळाला कोणतंही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मज्जाव असताना हा निर्णय कसा लागू करण्यात आला असा सवाल पत्रातून विचारला आहे. संस्थानच्या या बंदीमुळे मंदिराच्या आजूबाजूला फुलं, प्रसादाचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे शिवाय साई-भक्तांनीही नाराजी व्यक्त केली आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...