छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचं महान दैवत, महान राजे. 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला, म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली.
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज 'छत्रपती'
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
सूर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं..!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!