ताज्या बातम्या

Anil Parab : अनिल परब यांच्या नेतृत्वात, मुंबईतील ताज हॉटेलबाहेर ठाकरेसेनेचं आंदोलन

भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांची वांद्रे पश्चिम येथील ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये फसवणूक करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आज शिवसैनिकांनी उधळून लावला.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • मुंबईतील ताज हॉटेलबाहेर ठाकरेसेनेचं आंदोलन

  • अनिल परब यांच्या नेतृत्वात आंदोलन

  • हॉटेल व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

  • कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या

भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांची वांद्रे पश्चिम येथील ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये फसवणूक करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आज शिवसैनिकांनी उधळून लावला. शिवसैनिकांनी हॉटेलबाहेर जोरदार आंदोलन करून भाजपधार्जिण्या व्यवस्थापनाला हादरवून सोडले. शिवसेनेच्या कामगारांना भारतीय कामगार सेनेचे सदस्य असलेल्या जबरदस्तीने, भाजपकडे दादागिरीने वळवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, शिवसैनिकांनी असा इशारा यावेळी दिल्याने व्यवस्थापनाचे धाबे दणाणले.

ताज लैंड एंड हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन कार्यरत आहे. भारतीय कामगार सेना युनियनचा बोर्डही हॉटेलबाहेर आहे. 2 दिवसांपूर्वी भाजपने आपला झेंडा आणि अखिल भारतीय कर्मचारी संघ या भाजपप्रणीत युनियनचा बोर्ड थेट हॉटेलच्या आत लावला. इतकेच नव्हे तर, व्यवस्थापनाच्या माध्यमातून कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देऊन जबरदस्तीने भाजप युनियनच्या सदस्य अर्जावर त्यांच्या सह्या घेतल्या. ही बाब कानावर येताच आज शिवसैनिकांनी शिवसेना नेते- आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हॉटेलवर धडक देत जोरदार आंदोलन करून परिसर दणाणून सोडला तसेच अनिल परब यांनी होटल व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला

गेल्या कित्येक वर्षांपासून ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेची मान्यताप्राप्त युनियन कार्यरत आहे. भारतीय कामगार सेना युनियनचा बोर्डही हॉटेलबाहेर आहे. भाजपने आपला झेंडा आणि अखिल भारतीय कर्मचारी संघ या भाजपप्रणीत युनियनचा बोर्डदोन दिवसांपूर्वी थेट हॉटेलच्या आत लावला. इतकेच नव्हे तर, व्यवस्थापनाच्या माध्यमातून कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देऊन जबरदस्तीने भाजप युनियनच्या सदस्य अर्जांवर त्यांच्या सह्या घेतल्या. शिवसैनिकांनी शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ही बाब कानावर येताच आज हॉटेलवर धडक देत जोरदार आंदोलन करून परिसर दणाणून सोडला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा