थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
शिवसेना संस्थापक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील करिष्माई नेतृत्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त आज शिवतीर्थावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली. सकाळपासूनच शिवसैनिक, पदाधिकारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले आणि आदरांजली वाहिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत.
शिवाजी पार्क मैदानात असलेल्या स्मृतिस्थळी आज देशभरातील शैवसैनिक बाळासाहेब ठाकरे याबच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी दाखल होतील. ठाकरे कुटुंब आज ११.३० च्या दरम्यान दाखल होतील या ठिकाणी दिवसभर नेत्यांची उपस्थिती असेल बाईट देखील दिवसभर तिथे होतील. शिवसेनेचे नेते व पदाधिकारी यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाची, त्यांच्या विचारांची आणि हिंदुत्वाच्या भक्कम भूमिकेची उजळणी करत भावनिक संदेश दिले. अनेकांनी बाळासाहेबांच्या भाषणांची ध्वनिमुद्रणं ऐकत त्यांना स्मरलं.
मुंबई पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला असून, गर्दी सुरळीत पार पडावी यासाठी वाहतूक बदल करण्यात आले आहेत. आज दिवसाभरात शिवतीर्थावर भाविकांची मोठी वर्दळ अपेक्षित असून, बाळासाहेबांविषयीचा जनमानसातील आदर आणि प्रेम पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून येत आहे.