मयुरेश जाधव,कल्याण : मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी वरून आता राजकारण पेटू लागले आहे. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पोटनिवडणूकित काँग्रेसचा उमेदवार उभा करायला हवा होता, असे मत व्यक्त केले होते. देवरा यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावरआला असून, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच आता शिवसेना काँग्रेस कधीही जमणार नव्हतं फक्त सत्ता खाण्यासाठी ही लोक एकत्र आली आहेत. असे वक्तव्य भाजप आमदार आणि नेते गणपत गायकवाड यांनी कल्याण मध्ये केले आहे.
गणपत गायकवाड म्हणाले की, शिवसेना आणि काँग्रेस कधीही जमणार नव्हतं. फक्त सत्ता खाण्यासाठी ही लोक एकत्र आले होते. या लोकांकडे कधीही एकत्र येण्याची ताकद नव्हती, काँग्रेस हे अंतर्गत वादात काँग्रेस संपलेली आहे. काँग्रेसचे आपण पाहिले तर स्वतःचे कार्यकर्ते एकत्र करू शकत नाही, काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असेल तिकडे निवडून येईल.यामुळे काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना याची आम्हाला भीती नाही,आमचा उमेदवार तिकडे शंभर टक्के निवडून येईल असे गायकवाड यांनी सांगितले.