शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांनी काढलेलं रुग्णवाहिकेच टेंडर, फडणवीस सोलापूर प्रवेश, आशिया कप ट्रॉफी आणि शिंदे-फडणवीस सरकारचं आमदार निधी वाटप अशा अनेक विषयांवर चर्चा केली.
यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर आमदार निधी वाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र आणि शिंदे आल्यापासून हा पायंडा पडला आहे. आपल्या लोकांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षातील जे आमदार आहेत त्यांना कोरड ठेवायचं. हे लोकशाही विरोधी कारभार आहे. देशाच्या राष्ट्रपती यांनी दखल घेण्यासारखे आहे...हे फक्त महाराष्ट्रातच होते.. सध्या या राज्याला राज्यपाल नाही आणि असेल तरी ते भाजपचे हस्तक आहे".
"इतर आमदार निवडून आले नाही का...बरेच आमदार प्रथम निवडून आले आहे. यांची मग्रुरी आहे... जनतेचा पैसा माझ्या खिशातला पैसा आहे अशा प्रकारचं वाटप सुरु आहे असे त्यांना वाटते... 5 कोटी रुपये ते लाज आहे.. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही.. आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे".
"यात किती विकासकाम होतील हे माहित नाही पण कमिशनबाजी नक्की होईल... या सरकार मधल्या लोकांनी पैशाच्या जोरावर योजना आणली आहे. हे 5 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून परत वळवले जाणार ... मग मतदार विकत घेण्यासाठी वापरले जाणार....आम्हाला यावर आवाज उठवावा लागेल..."