विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला आणि कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली काल, आज आणि उद्या विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जात आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून राज्यपालांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे.
याचपार्श्वभूमीवर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य मंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केले आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास असलेल्या मंत्र्यांची नाव माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार आहे.
शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे ५ आमदार पास आहेत. शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे ही पास असलेल्या मंत्रींची नाव आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळणार असल्याची माहीती समोर आली आहे. या पैकी 10 ते 12 मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्री पदाची शपथ दिली जाणार असून शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आले आहे. यात त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल.
शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री.
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भूसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दिपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जून खोतकर
११) विजय शिवतारे