ताज्या बातम्या

Sanjay Raut On BJP : '70 टक्के उपऱ्यांचा पक्ष, अशी भाजपची ओळख, मात्र उद्या यांच्याकडे सत्ता नसेल, तेव्हा...'; संजय राऊतांना भाजपवर घणाघात

भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम महाराष्ट्रात पक्ष गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी केलं, अस संजय राऊत म्हणाले.

Published by : Rashmi Mane

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्ष फोडीचा आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, "चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शहा असतील, यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही. भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम महाराष्ट्रात पक्ष गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी केलं. बावनकुळे या मंडळींनी पैशाचा आणि सत्तेचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजनल पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडले आणि आपल्या सोबत भ्रष्टाचारांना देखील घेतले. आपला पक्ष वाढवला. मात्र उद्या यांच्याकडे सत्ता नसेल, तेव्हा यांची सूज उतरलेली असणार आहे."

पुढे राऊत म्हणाले की, "तुमचा पक्ष विचार धारेवर वाढवा. दुसऱ्यांचे पक्ष चोरी का करता. भारतीय जनता पक्ष आजच्या तारखेत 70 टक्के उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यांचा भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नाही. एवढं करूनसुद्धा त्यांची भूक भागत नाही. फक्त फोडा, फोडा आणि फोडा. बावनकुळे यांच्याकडे लोकं गांभीर्याने पाहत नाही. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस सोडा, आता ते शिंदे यांची शिवसेना देखील फोडणार आहेत, ते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडणार आहेत."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा